Heena Khan | अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. मात्र या आजाराचा सामना ती मोठ्या खंबीररित्या सामना करत आहे. आजाराच्या प्रत्येक ट्रीटमेंटबाबत ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत माहिती शेअर करत असते. यातच आता सोशल मीडियावर हिना खानचा प्रियकर रॉकी जयस्वालसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून दोघे लग्न करताय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र हा व्हिडीओ ‘सेलिब्रिटी शेफ्स’च्या सेटवरील आहे. जिथे हिना खान तिच्या बॉयफ्रेंडसह पोहोचली होती. तिथं तिचं भव्य स्वागत करण्यात आलं. व्हिडीओमध्ये हिना खान पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अगदी सुंदर दिसते. तर रॉकी पांढऱ्या शेरवानीमध्ये पाहायला मिळतो.
View this post on Instagram
दोघेही पाहुणे म्हणून या शोमध्ये आले होते. यावरून या भागाच्या थीम वेडिंगवर असू शकते, असा अंदाजही वर्तवला जात आहे. व्हिडिओमध्ये, पाहू शकता की सेलिब्रिटी शेफचे स्पर्धक हिना आणि रॉकी येताच डान्स करतात. त्याच वेळी, शोच्या स्पर्धक उषा नाडकर्णी या दोघांचे स्वागत करीत आहे. यावर हे दोघे लग्न करत आहेत? असा सवाल करत आहेत.
दरम्यान, हिना खान आणि रॉकी जयस्वाल बर्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत, हिनाच्या कठीण काळात रॉकी तिच्या प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर उभा राहिला आहे. याबाबत खास पोस्ट शेअर करत देखील तिने आपले प्रेम व्यक्त केले आहे. Heena Khan |
हेही वाचा: