कबुतरखाना बंदीचा वाद वाढला; जैनमुनीच्या धमकीला मराठी एकीकरण समिती देणार प्रत्युत्तर, आंदोलनाची हाक

Kabutar Khana | मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद वाढत असल्याचे दिसत आहे. कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे विरोध करत कबुतरखाना सुरु ठेवण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे.
यातच आता मराठी एकीकरण समिती देखील जैन समाजाच्या अवाजवी मागणीविरोधात आक्रमक झाली आहे. आज बुधवारी 13 ऑगस्ट रोजी दादरमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जैन समाजानं कबुतरखान्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आंदोलन करणार आहे.
मराठी एकीकरण समिती देणार उत्तर
मराठी एकीकरण समितीने कबुतरखान्यावरील बंदीसाठी आणि कबुतरखाना बंदीविरोधात आक्रमक आंदोलन करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली. जैन समाजाचे मुनी शस्त्र उचलण्याची भाषा करत आहेत. याला आता मराठी एकीकरण समितीच्या वतीनं उत्तर देण्यात येणार आहे. Kabutar Khana |
पोलिसांना निवेदन दिले जाणार
दादरमधील कबुतरखाना कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे. दादर कबुतरखाना इथे आंदोलन करून न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीला घेऊन मराठी एकीकरण समितीच्या वतीने पोलिसांना निवेदन दिले जाणार आहे.
या मागणीला घेऊन मराठीकरण समितीचे कार्यकर्ते आज सकाळी दादर कबुतराखाना येथे जमणार आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. Kabutar Khana |
हेही वाचा :





