Rahul Gandhi : “सततच्या पराभवांमुळे मनात द्वेष भरला”; भाजपचा राहुल गांधींना टोला
सततच्या पराभवांमुळे त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मनात द्वेष भरला आहे, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला.
Updated On:

Rahul Gandhi – कॉंग्रेसची एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये पीछेहाट होत आहे. सततच्या पराभवांमुळे त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मनात द्वेष भरला आहे, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला. लोकसभेत राहुल यांनी केलेल्या टीकेला भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले.
संसदेचे नियम, सभापती, घटनात्मक संस्था आणि पंतप्रधानांचा राहुल द्वेष करतात. आता ते देशाचाही द्वेष करू लागले आहेत. राहुल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा ९५ निवडणुकांमध्ये पराभव झाला. तो पक्ष पराभवाचे शतक ठोकेल. राहुल वारंवार मतचोरीचा मुद्दा उपस्थित करतात. खरेतर, जनतेने चोरांना मतदान करणे थांबवले आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.





