“लोकशाही तत्त्वाचा अवमान करून देशाला…”; आणीबाणीवरून PM मोदींची काँग्रेसवर सडकून टीका

PM Modi on Emergency| 25 जून 1975 साली देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. लोकशाहीच्या इतिहासात हा दिवस काळा दिवस म्हणून मानला जातो. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधींच्या सरकारच्या शिफारशीवरून घटनेच्या कलम 352 नुसार देशात आणीबाणी जाहीर केली. याची घोषणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रेडियोद्वारे केली होती. आज या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सद्वारे पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत लिहिले की, “आणीबाणीचा प्रतिकार करणाऱ्या सर्व महापुरुषांना आणि स्त्रियांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. हे आम्हाला स्मरण करून देते की काँग्रेस पक्षाने मूलभूत स्वातंत्र्य आणि भारताचे संविधान पायदळी तुडवले होते. केवळ सत्तेला चिकटून राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रत्येक लोकशाही तत्त्वाचा अवमान करून देशाला तुरुंगात टाकले होते. काँग्रेसशी असहमत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा छळ करण्यात आला. दुर्बल घटकांना लक्ष्य करण्यासाठी सामाजिक प्रतिगामी धोरणे आणली गेली.” PM Modi on Emergency|
Today is a day to pay homage to all those great men and women who resisted the Emergency.
The #DarkDaysOfEmergency remind us of how the Congress Party subverted basic freedoms and trampled over the Constitution of India which every Indian respects greatly.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2024
पुढे ते म्हणाले, “ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आपल्या राज्यघटनेवर प्रेम व्यक्त करण्याचा अधिकार नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी असंख्य वेळा कलम 356 लादले, माध्यम स्वातंत्र्य नष्ट करणारे विधेयक आणले, संघराज्य नष्ट केले आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचे उल्लंघन केले. आणीबाणी लादण्याची मानसिकता आजही त्या पक्षात जिवंत आहे. त्यांनी राज्यघटनेशी केलेली प्रतारणा सर्व प्रकारे लपवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांना वारंवार नाकारले आहे”, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. इतकेच काय तर काल 24 जून 2024 रोजी लोकसभेच्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनच्या दिवशीही मोदींनी आणीबाणीचा उल्लेख केला होता. PM Modi on Emergency|
संसदेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी कायम म्हणाले पंतप्रधान मोदी?
“भारताच्या लोकशाहीतील काळ्या अध्यायाला मंगळवारी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला. भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली आणि देश तुरुंगात बदलला. त्यामुळे 50 वर्षांपूर्वी जे केले होते ते पुन्हा कोणीही करू नये असा संकल्प देशवासीयांनी केला पाहिजे,” असेही मोदी म्हणाले होते. PM Modi on Emergency|
हेही वाचा:





