ग्राहकांनो… खिशाला लागणार कात्री! दसऱ्याच्या दिवशीच ‘सोने-चांदी महागली’

Gold -Silver Rate । भारतात दसऱ्याला सोन खरेदी केले जाते. आज १ २ ऑक्टोबरला सोने चांदीच्या बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत असली तरी सोने चांदीच्या किंमतीत दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला याचा फटका बसणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीने महागाईचे तोरण बांधले. या घडामोडीमुळे मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. या दमदार चढाईमुळे दसऱ्याला खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकाचा खिसा कापल्या जाणार आहे. जाणून घ्या लेटेस्ट दर…
Gold -Silver Rate । सोन्या – चांदीची किंमत
मागील दोन आठवड्यात सोन्याने 2300 रुपयांची मुसंडी मारली. तर या आठवड्यात या धातुत जवळपास हजार रुपयांची घसरण झाली. 7 ऑक्टोबर रोजी 220 रुपये तर 9 ऑक्टोबर रोजी सोने 760 रुपयांनी भाव उतरला. 10 ऑक्टोबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. तर 11 ऑक्टोबर रोजी सोन्याने 760 रुपयांची उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात पण दरवाढीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold -Silver Rate । मुंबई
१० ग्रॅम सोने- ७७,६७० रुपये आहे.
१०० ग्रॅम चांदी-९६१०० रुपयेआहे.
Gold -Silver Rate । पुणे
१० ग्रॅम सोने-७७,४१० रुपये आहे
१०० ग्रॅम चांदी- ७०,९६० रुपये आहे
Gold -Silver Rate । नागपूर
१० ग्रॅम सोने-७७,६७० रुपये आहे.
१०० ग्रॅम चांदी- ७०,९६० रुपये आहे.
Gold -Silver Rate । नाशिक
१० ग्रॅम सोने- ७७,६७० रुपये आहे.
१०० ग्रॅम चांदी- ७०,९९९ रुपये आहे.
gold and silver price today । सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
gold and silver price today । हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमांनुसार चालते.





