Nagar | संविधान मंदिराचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयुक्त ठरेल : महेंद्र गंधे

नगर, (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत. या हक्क व अधिकारांची माहिती जर विद्यार्थ्यांना लहानपणीच कळली तर त्यांचे जीवन अधिक सुखकर व सोपे होईल.
या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेला संविधान मंदिराचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन शहर भाजपचे विधानसभा निवडणूक् प्रमुख महेंद्र गंधे यांनी केले.
कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने जागतिक लोकशाही दिनानिमित्त संविधान मंदिरांचे उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ऑनलाइन पद्धतीने राज्यातील ४३४ शैक्षणिक संस्थांमध्ये केले. नगरच्या शासकीय तांत्रिक विद्यालयातील संविधान मंदिराचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण भागवत, भाजपाचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, माजी सरचिटणीस ज्ञानेश्वर काळे, अजय चितळे, सुमित बटुळे, चंद्रकांत पाटोळे, बाळासाहेब तागड आदींसह शासकीय तांत्रिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
सानप सानप म्हणाले, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना आपले अधिकार हक्क समजणे आवश्यक आहे. यासाठी संविधान मंदिराचा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल.
यावेळी वामन हराळे, दादा नन्नवरे, निदेशक यादव, विजयकुमार नेटके, किशोर उदमले, योगेश बिजले, प्रेमचंद असलकर, नलिनी वाकूडे, रोहित सुखधान आदी उपस्थित होते.





