पिंपरी | थोरवेंसाठी मतदारसंघात जनसंपर्क दौरा

खालापूर (वार्ताहर) – आमदार महेंद्र थोरवे यांच्या आदेशाने खालापूर तालुक्यात जनसंपर्क दौरा सुरू केला आहे. जनसंपर्क दौऱ्यात युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी सांगितले.
तसेच, मतदारसंघातील जनतेसाठी आमदार थोरवे यांनी अनेक कामे केल्यामुळे पुढील आमदार थोरवेच पाहिजेत असाही जनतेचा कल असल्याचे विचारे यांनी सांगितले.
आमदार महेंद्र थोरवे यांच्याकरिता मतदारसंघ बांधणीसाठी खालापूर तालुक्यात शिवसेना जनसंपर्क दौरा सुरु करण्यात आला असून कलोते पंचायत समिती वार्डातील अजरूंन येथून दौऱ्याची सुरूवात झाली.
यावेळी आंजरूण, माणकिवली, बीड जांबरूंग, केळवली, कलोते, खालापूर नगरपंचायतीमधील वणवे, निंबोडे नंतर निगडोली गावात नागरिकांसोबत पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला.
मतदारसंघातील तरूणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या माध्यमातून नंदनवन महारोजगार मेळावा आयोजित केला होता.
यामध्ये २३०० युवकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील ११८८ तरूणांना नोकरीचे पत्र देण्यात आले. तर, ५४८ तरूणांना नोकरी मिळणार आहे. ५०० तरुणांना जॉब कार्ड दिले असल्याचे युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी उपस्थितांना सांगितले.





