‘सतत चुका करणे ही सवय बनते आणि…’; सलमान खानची पोस्ट

Salman Khan | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहतात. लवकरच तो ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र त्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर रात्रीच्या सुमारास एक पोस्ट केली आहे. यात त्याने वडिलांचे योग्य वेळी न ऐकल्यामुळे आता पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
सलमान खानची पोस्ट
“वर्तमान हा तुमचा भूतकाळ बनवतो. भूतकाळ तुमचे भविष्य घडवतो. वर्तमान ही एक संधी आहे, त्यामुळे योग्य वागा. सतत चुका करणे ही सवय बनते आणि मग तुमचा तसाच स्वभाव होतो. कोणालाही दोष देऊ नका. तुम्हाला कोणीही तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी करायला भाग पाडू शकत नाही. असे माझा वडील मला नेहमी बोलायचे, जे अगदी बरोबर आहे. मी त्यांचे हे बोलणे पूर्वी ऐकले असते तर बर झालं असतं. पण ठीक आहे, अजून उशीर झालेला नाही,” असे सलमान खानने पोस्टमध्ये म्हंटले आहे. Salman Khan |
View this post on Instagram
सलमान खान सध्या ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूट लडाखमध्ये होणार आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. सिनेमात तो भारतीय सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. Salman Khan |
हेही वाचा :





