Huma Qureshi: “सततच्या ट्रोलिंगमुळे आत्मविश्वास तुटला होता”; हुमा कुरेशीने सांगितला बॉडी शेमिंगचा वेदनादायक अनुभव
Huma Qureshi हुमा म्हणाली, “जेव्हा लोक सतत तुम्हाला जज करतात, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होतो. एक काळ असा आला होता की मला स्वतःबद्दल खूप निराश वाटत होतं. मला असं वाटू लागलं होतं की कदाचित मी हे सगळं करू शकणार नाही.” या सततच्या टीकेमुळे ती स्वतःबद्दल अस्वस्थ झाली होती.

Huma Qureshi: अभिनेत्री हुमा कुरेशीने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील कठीण अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिला तिच्या शरीरयष्टी, लूक आणि दिसण्यावरून अनेकदा ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागलं. या सततच्या टीकेचा तिच्या आत्मविश्वासावर मोठा परिणाम झाला होता, असं हुमा म्हणाली.
हुमा तिचा भाऊ आणि अभिनेता साकिब सलीमसोबत नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने इंडस्ट्रीतील संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यातील काही कठीण क्षणांबद्दल खुलासा केला. हुमा म्हणाली की, तिच्या दुसऱ्या चित्रपटानंतर सोशल मीडियावर आणि इंडस्ट्रीत तिच्या लूकवरून अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोक सतत तिच्या शरीरावर आणि दिसण्यावर टिप्पणी करत होते.
हुमा म्हणाली, “जेव्हा लोक सतत तुम्हाला जज करतात, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होतो. एक काळ असा आला होता की मला स्वतःबद्दल खूप निराश वाटत होतं. मला असं वाटू लागलं होतं की कदाचित मी हे सगळं करू शकणार नाही.” या सततच्या टीकेमुळे ती स्वतःबद्दल अस्वस्थ झाली होती.

Huma Qureshi
मात्र, कालांतराने हुमा यांनी स्वतःला सावरण्यास सुरुवात केली. तिने मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं आणि स्वतःला समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले. हुमा म्हणाली की, तिने ध्यानधारणा सुरू केली, डायरी लिहायला सुरुवात केली आणि थेरपीची मदतही घेतली. या सगळ्या गोष्टींमुळे तिला स्वतःला स्वीकारायला आणि स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला मदत झाली.
ती पुढे म्हणाली, “आता मी स्वतःवर केलेल्या जोक्सवरही हसू शकते. मी गोष्टी अधिक सकारात्मक पद्धतीने घ्यायला शिकले आहे.” तिच्या या वक्तव्यामुळे अनेक चाहत्यांनी तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, हुमा कुरेशी लवकरच अभिनेता यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नयनतारा, कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मात्र, या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.





