सचेत-परंपरा झाले आई-बाबा; व्हिडिओ शेअर करत दाखवली बाळाची झलक

Sachet-Parampara | प्रसिद्ध संगीतकार-गायक सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर आई-बाबा झाले आहेत. परंपराने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यात बाळाची झलक दाखवण्यात आली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सचेतने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि महादेवाच्या कृपेमुळे हा आनंद मिळाल्याचे चाहत्यांना सांगितले. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘महादेवाच्या आशीर्वादाने, आमच्या लाडक्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. नमः पार्वती पतये हर हर महादेव, जय माता दी!’
या व्हिडिओमध्ये बाळाची झलक दाखवली आहे. तिघांच्या हाताचे फोटो शेअर केले आहेत. त्यात मध्ये चिमुकल्या मुलाचा हात आहे. अनेकांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
View this post on Instagram
सचेत आणि परंपरा ही जोडी त्यांच्या अप्रतिम आवाजाने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. या दोघांची खरी ओळख अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटातील ‘बेखयाली’ या सुपरहिट गाण्याने झाली. याशिवाय ‘शिव तांडव स्तोत्रम’मुळे देखील त्यांना मोठी ओळख मिळाली.
दरम्यान, सचेत आणि परंपरा 2015 साली एका रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाले होते. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली आणि जवळपास पाच वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले. आता त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे.
हेही वाचा:





