कॉंग्रेसचा विजय हा मोदींचा पराभव; लालू प्रसाद यादव यांचे वक्तव्य

पाटणा : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव मानला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी केले. दिल्लीला जाण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
लालू यादव यांची मोठी मुलगी, लोकसभा खासदार मीसा भारती, त्यांच्या वडिलांसोबत होत्या व त्यांनीही एक्झिट पोलच्या संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भारती म्हणाल्या, मला हा इंडिया आघाडीचा विजय दिसतो. आमचा पक्षही या आघाडीचा एक भाग आहे.
हरियाणाला लोकांचे सरकार (जनता की सरकार) मिळणार आहे. शनिवारी झालेल्या अनेक एक्झिट पोलने हरियाणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. ॲक्सिस माय इंडियाने अंदाज वर्तवला आहे की काँग्रेस सुमारे 59 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल.





