नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटवून दिली कार

नागपूर – मनी लाँड्रिंग प्रकरणी “ईडी”कडून मंगळवारी दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीविरोधात काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, देशभर आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरातील जीपीओ चौकात कार पेटवून दिली, मात्र ती भंगारातली असल्याने मोठं नुकसान झालं नाही. त्यामुळे परिसरात तणाव पाहायला मिळाला. पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
युवक काँग्रेसच्या या आंदोलनात पेटवून देण्यात आलेली कार भंगारातली निघाली आहे. ज्या कारला इंजिन नव्हतं, स्टेरिंग नव्हतं, इतर कोणतेही स्पेअर पार्ट नव्हते. ती भंगारातली कार हाताने ढकलून चौकात आणण्यात आली आणि नंतर पेटवून देण्यात आली.
भारताला मोठा धक्का, पदकाचा प्रबळ दावेदार नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर, जाणून घ्या कारण..
कार पेटवल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी आग विझवली. पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या युवक काँग्रेसच्या सुमारे 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
फारूख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉंडरींग प्रकरणात आरोपपत्र दाखल





