Baramati by-election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सुनेत्रा पवारांविरोधात न लढण्याचा निर्णय
Baramati by-election : अखेर काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे.

Baramati by-election : बारामती विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होण्यासाठी महायुतीसह शरद पवार गटाकडून तयारी सुरू होती. अखेर काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे (Aksha More) यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषदेत म्हणाले की, “बारामती नाही तर देशभरात भाजपच्या विरोधात काँग्रेसने भूमिका घेतली होती. एकूण सहा अर्ज बारामतीसाठी आले होते. वैचारिक भूमिका म्हणून भाजपला विरोध करण्यासाठी निवडणूकीत अर्ज भरला होता. रोहित पवारांनी भल्या पहाटे येऊन बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली. अजित पवार यांच्या संदर्भात सहकार्याची भूमिका घ्या अशी विनंती केली.”
‘संस्कृती आणि संवेदना म्हणून बारामतच्या पोटनिवडणुकीतून माघार’
तर यावेळी हर्षवर्धन पवार यांनी पार्थ पवार यांनी कॉँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर, “काही जणांनी अपरिपक्व वक्तव्य केली. त्या संदर्भात कुटुंबांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले. पुढे सपकाळ म्हणाले, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ही विनंती आणि सूचना दिल्या, यानंतर सर्व काँग्रेस नेतृत्व यांच्यासोबत चर्चा केली. लढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. मात्र संस्कृती आणि संवेदना म्हणून आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेत आहोत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. Baramati by-election

Baramati by-election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सुनेत्रा पवारांविरोधात न लढण्याचा निर्णय
सुनेत्रा पवार यांनी माझ्याशी फोनवर देखील संवाद साधला आणि त्यांनी विनंती केली की काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी. काँग्रेसच्या राज्यातील विविध नेत्यांशी यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांनी संपर्क साधला होता. सुप्रिया सुळे यांनी देखील फोनवरून माझ्याशी संवाद साधला. सुनेत्रा पवार यांनी देखील दिल्लीत आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट घेतली” असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. Baramati by-election
दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.Baramati by-election





