काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई : विधानसभेच्या निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. या सर्व राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकलं आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी मोठी तयारी केल्याचं दिसत आहे. काँग्रेस १ ऑक्टोबरपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहे. काँग्रेसने याची जबाबदारी पक्षातील काही नेत्यांवर सोपवली आहे.
काँग्रेस 1 ऑक्टोबरपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहे. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत नेते जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेणार आहे. तर काँग्रेसचे बडे नेते त्यांचा अहवाल हा प्रदेश काँग्रेसला देणार आहे. काँग्रेस पक्षाकडे आतापर्यंत एकूण 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे.
‘या’ नेत्यांवर सोपवण्यात आली जबाबदारी
काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्राकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, वसंत पुरके, नाना गावंडे या नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.





