काँग्रेसचा ट्रॅप! “गद्दारी करणाऱ्या आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवणार”; नाना पटोलेंनी दिली माहिती

MLC Election Results On Nana Patole| विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी काल 12 जुलै 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व 274 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय झाला.
तर महाविकास आघाडीतील तीनपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थन असलेल्या शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र या निवडणुकीत पराभव झाला. यादरम्यान काँग्रेसची आठ मत फुटल्याचे माहिती समोर आली. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेत गद्दारी करणाऱ्या आमदारांची यादी हायकमांडकडे सादर केली जाणार असल्याचे म्हंटले आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
यावेळी नाना पटोले यांनी मत फुटल्याचे मान्य केले आहे. “याआधीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे होते, तेव्हाही असाच प्रकार झाला होता. तेव्हाच्या निवडणुकीतील बदमाश लोक ओळखले गेले नव्हते. हाच दगाफटका आताही होऊ शकतो हे हेरून फुटीर आमदार ओळखण्यासाठी काँग्रेसने ट्रॅप लावला होता.”
पुढे नाना पटोले म्हणाले, “या सापळ्यात हे बदमाश आमदार सापडले आहेत. आम्ही याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे. पार्टीविरोधी काम करणाऱ्या, पार्टीशी बेईमानी करणाऱ्या, गद्दारी करणाऱ्या आमदरांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल,” असे स्पष्टपणे नाना पटोले म्हणाले. MLC Election Results On Nana Patole|
दरम्यान, काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे 15 आमदार सभागृहात होते. त्यामुळे जयंत पाटील यांच्याकडे 16 मते होती. MLC Election Results On Nana Patole|
जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी 7 मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती. पण, त्यांना 7 मतांची जुळवाजुळव करणे शक्य झाले नसल्याचे दिसून आले. तर ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत, त्यांच्या मिलिंद नार्वेकरांना आणखी 8 मते हवी होती. निवडणूक निकालानंतर त्यांना ही मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा:





