काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा यांच्या अडचणीत वाढ ! मराठा समुदायाबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

मुंबई : काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आलोक शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोमध्ये मराठी समूदायाची तुलना बलात्कारी लोकांसोबत करणारे वक्तव्य केले. यामुळे आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. या प्रकरणी आलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर एका वृत्तवाहिनीवर चर्चा सुरु होती. यादरम्यान एका एका प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता आलोक शर्मा यांनी भाजपच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारला. बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या मराठी माणसांचं रक्षण भाजप पक्ष करणार का ? असा सवाल त्यांनी केला. बदलापूरमध्ये एखाद्या मराठी व्यक्तीने बलात्कार केला तर त्यावेळीही भाजप त्यांना पाठीशी घालणार का? असा प्रश्न आलोक शर्मा यांनी विचारला. आलोक शर्मांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून तक्रार दाखल
मराठी माणसाबद्दल आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अलोक शर्मा यांच्याविरोधात शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे. अलोक शर्मा यांना काँग्रेसने काढून टाकावं, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील शिवसेनेकडून करण्यात आली आहे.





