अदानी समूहाच्या विरोधात साताऱ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

सातारा -अदानी समूहाला स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) 80 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. अदानी समूहाचा जागतिक घोटाळा उघडकीस आल्याने या दोन्ही वित्तीय संस्थांचे घेतलेले कर्ज बुडण्याचा धोका असल्याने सर्वसामान्यांचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टेट बॅंक ऑफ इंडिया व एलआयसी कार्यालयासमोर कॉंग्रेसच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करुन अदानींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मोदी सरकारच्या मेहेरबानीमुळे अदानी उद्योग समूहाने स्टेट बॅंक ऑफ इंडिया व एलआयसीचे 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. नुकताच अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आल्याने अदानी समूहाचे शेअर्स गडगडून त्यांचे समस्त विरोधी पक्षांनी आजच्या बैठकीत घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, कॉंग्रेस पक्षाला अदानी प्रकरणाने एकप्रकारे बळकटी प्रदान केली असे म्हणायला हरकत नाही. अलिकडच्या काळातील अदानी प्रकरण हा एकमेव असा मुद्या आहे ज्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष कॉंग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने संसदेची संयुक्त समिती गठीत करायला हवी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करायला पाहिजे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.





