संसदेबाहेर काँग्रेसचे अनोखे आंदोलन ; राहुल गांधी यांनी राजनाथ सिंह यांना दिले गुलाब अन् तिरंगा ; संरक्षणमंत्र्यांनी स्वीकारण्यास दिला नकार

Congress Protest in Parliament । इंडिया आघाडीतील अनेक घटक पक्षांच्या खासदारांनी आज संसदेच्या परिसरात अनोखे आंदोलन केले. अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावर सरकारकडून चर्चा करण्यास होत असलेल्या टाळाटाळीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी भाजप सदस्यांना तिरंगा आणि गुलाबपुष्प देताना दिसून आले.
संरक्षणमंत्र्यांनी भेट स्वीकारण्यास दिला नकार Congress Protest in Parliament ।
यादरम्यान राजनाथ सिंह संसदेत जाण्यासाठी कारमधून बाहेर पडताच राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी राजनाथ सिंह यांना गुलाबपुष्प आणि तिरंगा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संरक्षणमंत्र्यांनी ही भेट स्वीकारण्यास नकार दिला.
#WATCH | Delhi | In a unique protest in Parliament premises, Congress MP and LoP Lok Sabha, Rahul Gandhi gives a Rose flower and Tiranga to Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/9GlGIvh3Yz
— ANI (@ANI) December 11, 2024
काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि इतर काही पक्षांचे खासदार संसद भवनाच्या ‘मकर गेट’जवळ जमले होते. त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या खासदारांना तिरंगा आणि गुलाबाची फुले दिली. यावेळी गुलाब देतेवेळी त्यांनी “देश विकू देऊ नका.” असा संदेश देखील दिला. या आंदोलनात काँग्रेसच्या सरचिटणीस आणि नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचाही सहभाग होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी निळ्या पिशव्या घेऊन निदर्शने केली होती.
संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी Congress Protest in Parliament ।
अमेरिकन वकिलांनी अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांवर आरोप लावल्यानंतर, काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्ष आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी करत आहेत. याप्रकरणी उद्योगपती गौतम अदानी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी राहुल गांधी यांनी नुकतीच केली होती. अदानी समूहाने सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.





