काँग्रेस संसदीय पक्षाची बुधवारी सर्वसाधारण सभा; उर्वरित अधिवेशनाची रणनीती ठरवणार
Updated On:

नवी दिल्ली – काँग्रेसच्या संसदीय पक्षाची सर्वसाधारण सभा ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजता सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
सध्या संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. त्यावरून कॉंग्रेसने अर्थसंकल्पातील पक्षपातीपणा तसेच मूलभूत समस्या दुर्लक्षित केल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यातच काल राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर यावरून जो जोरदार हल्लाबोल केला आहे तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
राहुलगांधी यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सरकारने केंद्रीयमंत्र्यांच्या पत्रकार परिषदांचा धडका लावला आहे. या पाश्वभूमीवर कॉंग्रेस संसदीयपक्षाच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत अधिवेशनाच्या उर्वरीत काळासाठीची रणनिती निश्चीत केली जाणार आहे.





