वक्फ विधेयकाविरुद्ध काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार ; डीएमकेकडून याची अगोदरच घोषणा

congress on waqf bill । वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२५ शुक्रवारी संसदेने मंजूर केले. लोकसभेतून मंजुरी मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने २८८ आणि विरोधात २३२ मते पडली, तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने १२८ आणि विरोधात ९५ मते पडली. दरम्यान,या विधेयकाच्या विरोधात
आता काँग्रेस न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डीएमकेही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार congress on waqf bill ।
काँग्रेस पक्ष वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश सोशल मीडियावर एक लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या संबंधी घोषणा केली असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे डीएमकेकडून यापूर्वीच वक्फ विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे.
The INC’s challenge of the CAA, 2019 is being heard in the Supreme Court.
The INC’s challenge of the 2019 amendments to the RTI Act, 2005 is being heard in the Supreme Court.
The INC’s challenge to the validity of the amendments to the Conduct of Election Rules (2024) is being…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 4, 2025
काँग्रेसने CAA, २०१९ ला दिलेल्या आव्हानावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २००५ च्या माहिती अधिकार कायद्यातील २०१९ च्या सुधारणांना काँग्रेसने आव्हान दिले आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निवडणूक आचार नियम (२०२४) मधील दुरुस्तीच्या वैधतेला काँग्रेसने आव्हान दिले आहे, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
congress on waqf bill ।
१९९१ च्या पूजास्थळ कायद्याची मूळ भावना राखण्यासाठी काँग्रेसच्या हस्तक्षेपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. काँग्रेस लवकरच वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ च्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही भारतीय संविधानात नमूद केलेल्या तत्त्वांवर, तरतुदींवर आणि कार्यपद्धतींवर मोदी सरकारच्या सर्व हल्ल्यांना विरोध करत राहू.





