मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी काँग्रेस पदाधिकार्यांना भोवलं; 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

भंडारा : वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प होत आहे. त्याच्या भूमिपूजन समारंभाकरिता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भंडाऱ्यामध्ये गेले होते. यादरम्यान भूमीपूजनाचा कार्यक्रम आटपून सभास्थळाकडं जात असताना जिल्हा परिषद चौकात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आता हीच घोषणाबाजी त्यांना भोवली आहे.
याप्रकरणी युवक काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, सभास्थळी गोसेखुर्द प्रकल्प बाधित एका महिलेसह पाच जणांनी सभेदरम्यान नारेबाजी करीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अशा ११ जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विविध कामांचे केले उदघाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भंडाऱ्यात काल 547 कोटींच्या विकासकामाच्या भूमिपूजन संपन्न झाले. यात 102 कोटीच्या खर्चातून होत असलेल्या जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचा देखील समावेश आहे.





