पणजी – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवावी. त्यांनी विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पक्षाचे खासदार फ्रान्सिस्को सरदिन्हा यांनी सोमवारी केले.
कॉंग्रेसच्या दृष्टीने भारत जोडो यात्रा अतिशय महत्वाची आहे. तळागाळात पक्षाचा विस्तार व्हावा असे सर्वच कॉंग्रेसजनांना वाटते. यात्रेच्या माध्यमातून राहुल यांनी अतिशय विलक्षण कामगिरी केली आहे. पण, आता राहुल यांनी पक्षाच्या प्रचारासाठी गुजरात आणि हिमाचलला जाण्याची गरज आहे.
भाजपचा पराभव करण्याची क्षमता केवळ कॉंग्रेसमध्येच आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राहुल यांनी त्या दोन्ही राज्यांत जावे, अशी भूमिका गोव्याचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या सरदिन्हा यांनी मांडली.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी खांबाला झेंडे बांधत असताना घडली ‘ही’ दुर्घटना
भारत जोडो यात्रेचा प्रारंभ 7 सप्टेंबरला झाला. ती यात्रा 150 दिवस चालणार आहे. त्यामुळे गुुजरात आणि हिमाचलात प्रचारासाठी राहुल अधिक वेळ देऊ शकणार नसल्याचे संकेत आहेत.