कॉंग्रेस नेते करणार आम आदमीप्रमाणे रेल्वेप्रवास
Updated On:

नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरासाठी पक्षाचे अनेक नेते रेल्वेप्रवास करून राजस्थानात दाखल होणार आहेत. आम्हीही आम आदमीच आहोत असा संदेश त्यातून कॉंग्रेस नेत्यांना जनतेपर्यंत पोहचवायचा आहे.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये 13 ते 15 मे या कालावधीत कॉंग्रेसचे चिंतन शिबिर होणार आहे. त्याआधी सोमवारी दिल्लीत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीत राहुल यांनी उदयपूरला रेल्वेने जाण्याचा स्वत:चा प्लॅन उघड केला. कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी प्रवासासाठी आपापले प्लॅन बनवण्याची मुभाही त्यांनी दिली.
राहुल यांच्या समवेत अनेक नेत्यांनी रेल्वेप्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, 50 हून अधिक नेते रेल्वेने उदयपूरला जाणार असल्याचे समजते. कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराला 422 नेते उपस्थित राहणार आहेत.




