Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का! बडा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला आणखी एक मोठ खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षांतराच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता अमरावतीतील काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे काँग्रेस नेते आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व सुधाकर भारसाकळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)
मंगळवारी अमरावतीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सुधाकर भारसाकळे यांनी स्वतःच पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या उपस्थितीत लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या मेळाव्याला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Maharashtra Politics)
मेळाव्यात बोलताना भारसाकळे म्हणाले, मी नवी वाट निवडली आहे आणि त्या वाटेने पुढे जायचे ठरवले आहे. तुम्ही माझ्यासोबत राहाल, एवढीच अपेक्षा आहे. दोन-तीन दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून बच्चू कडू यांचे नेतृत्वही सोबत राहणार आहे. (Maharashtra Politics)
तसेच, काँग्रेसला जसं मोठं केलं, तसंच शिवसेनेलाही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेणार नाही, ही ग्वाही देतो, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. सुधाकर भारसाकळे यांच्या संभाव्य पक्षप्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसण्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)





