काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारला अपघात
Updated On:

नागपूर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या कारचा अपघात झाला आहे. ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. रात्री उशिरा ऑटोमोटिव्ह चौकात हा अपघात झाला. या अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
नितीन राऊत हे उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावलेत. अपघातात नितीन राऊत यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नितीन राऊत हे सुखरूप असून या अपघात प्रकरणी कपिल नगर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.





