मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, परदेशी दबावामुळे कारवाई केली नाही – पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

नवी मुंबई – “मुंबई हल्ल्याच्या वेळी काँग्रेसने गुडघे टेकले आणि परदेशी दबावामुळे पाकिस्तानवर कारवाई केली नाही,” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. नवी मुंबईतील विमानतळाच्या उद्घाटनानंतर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीच नव्हे तर भारतातील सर्वाधिक सजीव शहरांपैकी एक आहे. त्यामुळेच 2008 मध्ये दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. मात्र त्या वेळी काँग्रेस सरकारने कमजोरी दाखवली आणि दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले.”
मोदी पुढे म्हणाले, “काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते, जे देशाचे गृह मंत्रीही राहिले आहेत, त्यांनी एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई हल्ल्यानंतर आपल्या सेना पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होत्या आणि देशही त्या कारवाईच्या प्रतीक्षेत होता. परंतु त्या काँग्रेस नेत्यांच्या मते, एका परदेशी देशाच्या दबावामुळे काँग्रेस सरकारने आपल्या सेनेला हल्ला करण्यापासून रोखले.”
#WATCH | Navi Mumbai | PM Modi says, “…Mumbai is not only the economic capital city but also one of the most vibrant cities in India. This is the reason terrorists attacked Mumbai in 2008. But the then Congress government gave a message of weakness. Recently, a senior Congress… pic.twitter.com/HyU5wN1NuC
— ANI (@ANI) October 8, 2025
“काँग्रेसने देशाला हे सांगितले पाहिजे की तो परदेशी दबाव कोणाचा होता आणि कोणत्या कारणामुळे देशाच्या भावनांचा आणि सुरक्षेचा विश्वासघात करण्यात आला,” असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला. “काँग्रेसच्या या दुर्बलतेमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढले, देशाची सुरक्षा धोक्यात आली आणि त्याची किंमत देशाला अनेक जीव गमावून चुकवावी लागली,” असेही त्यांनी नमूद केले.
मोदी म्हणाले, “आजचा भारत हा दमदार भारत आहे. आम्ही देश आणि देशवासीयांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करत नाही. आजचा भारत घरात घुसून मारतो, आणि हे जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाहिले आहे.”
चिदंबरम काय म्हणाले होते पॉडकास्टमध्ये?
यूपीए सरकारमध्ये गृह मंत्री राहिलेले पी. चिदंबरम यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले होते की, मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर ते पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई करू इच्छित होते. त्या वेळी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलीझा राईस दिल्लीला येऊन त्यांची आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती आणि भारताने सैनिकी कारवाई करू नये, असा सल्ला दिला होता. दरम्यान, मुंबई हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला प्रत्युत्तर देण्यापासून रोखले होते, या दाव्याचे चिदंबरम यांनी खंडन केले होते.
On the way to Navi Mumbai to take part in the programme marking the inauguration of Phase-1 of the Navi Mumbai International Airport. With this, the Mumbai Metropolitan Region will get its second major international airport, thus boosting commerce and connectivity. The final… pic.twitter.com/t6v82O6Een
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2025





