ISRO Solar Mission : आदित्य एल-1 ने तिसरी कक्षा बदलली; इस्रोने दिली महत्वाची माहिती

श्रीहरिकोटा – आपल्या ताज्या अपडेटमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने म्हटले आहे की आदित्य एल-1 ची पृथ्वीभोवतीची तिसरी कक्षा बदलली आहे. या कक्षेला अर्थ बाउंड मॅन्युव्हर म्हणतात. सध्या सूर्य मिशन पृथ्वीभोवती 296 किमी गुणिले 71,767 किमीच्या अंडाकृती कक्षेत फिरत आहे.
इस्रोने पुढे सांगितले की, आता आदित्यची पुढील कक्षा 15 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता बदलली जाईल. आपल्या सुस्थितीची माहिती देण्यासाठी आदित्य एल-1ने त्याचा सेल्फी पाठवला होता आणि सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. तसेच त्याचे सर्व कॅमेरे व्यवस्थित काम करत असल्याचे सांगितले. त्याने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो काढले आणि व्हिडिओ बनवला.
या सौर मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर, इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले होते की, आदित्यला त्याचे ध्येय गाठण्यासाठी सुमारे चार महिने लागतील. यानंतर तो अभ्यासाला सुरुवात करेल. आता इस्रो 15 सप्टेंबरची वाट पाहत आहे. या दिवशी चौथ्यांदा आपली कक्षा बदलून आदित्य एल-1 आपल्या चार महिन्यांच्या दीर्घ प्रवासाला निघेल.





