Lok Sabha Election 2024 । भाजपने बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट जाहीर केले आहे. पंकजा मुंडे यांनी देखील त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वर्गणी काढून बीडमध्ये घर बांधून देण्याचं आवाहन केलं.
त्या म्हणाल्या, ;मी सर्वात पहिले बीडमध्ये घर बांधायाला सुरुवात करणार आहे. मला तुम्ही जागा घेऊन दिली तर मी बीडमध्ये घर बांधेन, कारण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही सर्वांनी वर्गणी काढून जागा घेऊन दिली तर मी तिथे भूमीपूजन करेन, पहिली कुदळ मारेन आणि तुमच्याच नावावर घर बांधेन.’
‘मी बीडमध्ये मरेपर्यंत राहीन. आपण बीडमध्ये छान घर बांधू. आष्टी, गेवराई आणि बीड मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी बीडमधल्या घरात राहीन तर केज, माजलगाव आणि परळी मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी परळीत मुक्काम करेन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देते. या घरांमध्ये राहीन आणि येथूनच तुमच्याबरोबर संपर्कात राहीन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देतेय, मतदारांना नाही. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी इथे राहण्याचा माझा मानस आहे.’ अशाही त्या म्हणाल्या आहे
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बीडमधून बजरंग सोनवणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांसोबत होते. मात्र काही महिन्यातच त्यांनी घड्याळ सोडून तुतारी हातामध्ये घेतली आणि ते शरद पवारांच्या गटात सामील झाले
येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून सोनवणे यांनी साखर कारखान्यावर काम करत आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला. यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत.
2019 ला दिली प्रीतम मुंडेंना टफ फाईट
बजरंग सोनवणे यांनी 2019 मध्ये झालेल्या बीड लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात दमदार फाईट दिली होती. या लोकसभेत प्रीतम मुंडे यांना 678,175 तर सोनवणे यांना 5,09,807 मते मिळाली होती.यावेळी वंचितच्या उमेदवाराला देखील 92,139 मते मिळाली होती. मात्र यावेळी सोनवणे यांची मोठी ताकद बीडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले होते.
हे वाचलं का ? ‘जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…’ एकनाथ शिंदेंची खोचक टोला