काँग्रेसचा हल्लाबोल, ‘लोकांना पीएम मोदींचे अच्छे दिन नको’

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढी होताना आता पाहायला मिळत आहेत. देशातही आता सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान, यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलमध्ये ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रमुख दूध कंपन्यांनी दूधाचा दर २ ते ५ रुपये प्रतिलीटर वाढवला होता. त्यामुळे ही वाढती महागाई सर्वसामान्यांच्या खिशाला भार देत आहेत. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. अनेक महिन्यांनी एलपीजी सिलेंडरचा दर वाढवण्यात आला आहे. यावरून आता काँग्रेस पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले,”आता लोकांना पीएम मोदींचे अच्छे दिन नकोच आहेत, तर त्यांना पूर्वीसारखे दिवस हवे आहेत.’असं म्हणत त्यांनी मोदी सरकावर टीका केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांचे ट्विट
भाजपाई जीत के साथ मोदी जी के “महंगे दिन” वापस आ गए हैं।
भाजपा को जीत का आराम मिलते ही फ़िर महंगाई ने जनता का जीना हराम कर दिया है।
यूपी में अमित शाह जी ने कहा था कि चुनाव जिताओ और होली पर मुफ़्त गैस सिलेंडर पाओ।
मुफ़्त तो दिए नहीं ,अब महंगे दे रहे हैं।#LPGPriceHike pic.twitter.com/3GuTtVvr8Q
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 22, 2022
दरम्यान,दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागत आहेत. याआधी ८९९ रुपये ५० पैसे मोजावे लागत होते. आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही एलपीजीचा दर वाढला असून आता ८९९ रुपये ५ पैशांच्या जागी ९४९ रुपये ५ पैसे मोजावे लागणार आहेत. चेन्नईत हा दर ९६५ रुपये ५ पैशांवर आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचा दर वाढून ९७६ रुपये झाला आहे. याआधी हा दर ९२६ रुपये होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत दर ९३८ वरुन थेट ९८७ रुपये ५ पैसे झाला आहे. देशात गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अखेर वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८४ तर डिझेल ८३ पैशांनी महागलं आहे.
राजधानी दिल्लीमध्ये आज म्हणजेच २२ मार्च २०२२ ला पेट्रोलचा दर ९५ रुपये ४१ पैशांवरुन वाढत प्रतिलीटर ९६ रुपये २१ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ८६ रुपये ६७ पैशांवरुन ८७ रुपये ४७ पैशांवर पोहोचला आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलचा दर १०९ रुपये ९८ पैशांवरुन वाढून प्रतीलिटर ११० रुपये ८२ पैसे झाला आहे. तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे. हा दर गेल्या चार महिन्यांपासून ९४ रुपये १४ पैसे होता.





