काँग्रेसकडून गौरव गोगोई यांची लोकसभेतील पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती
Updated On:

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने गौरव गोगोई यांची लोकसभेतील पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयाबाबतचे पत्र सभापती ओम बिर्ला यांना पाठवण्यात आले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना पत्र लिहून लोकसभेत काँग्रेस पक्षासाठी उपनेते, मुख्य व्हीप आणि दोन व्हिप यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे, असे एआयसीसीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितले.
गोगोई हे लोकसभा सभागृहात पक्षाचे उपनेते असतील, तर केरळचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडीकुन्नील सुरेश हे पक्षाचे मुख्य व्हिप असतील. तसेच विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर आणि किशनगंजचे खासदार मोहम्मद जावेद हे लोकसभेत पक्षाचे अन्य दोन व्हिप असतील, असे ते म्हणाले.





