मोठी बातमी: काँग्रेसकडून विनेश फोगटला उमेदवारी जाहीर, बजरंग पुनिया यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये प्रवेश करताच पक्षाने कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने बजरंग पुनिया यांना शेतकरी सेलचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष केले आहे. काँग्रेसने जारी केलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बजरंग पुनिया यांची अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला तत्काळ प्रभावाने मान्यता दिली आहे.
बजरंग पुनिया यांनी आजच केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश –
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम देत ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी शुक्रवारी राजकीय मैदानात उतरून काँग्रेसशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी विनेश आणि बजरंग यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.
विनेश फोगट यांना जुलाना येथून उमेदवारी –
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज शुक्रवारी (दि. 6) रात्री उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 31 उमेदवारांची नावे आहेत. पक्षाने जुलानामधून कुस्तीपटू विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में हरियाणा विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/0GsZyTFDVD
— Congress (@INCIndia) September 6, 2024





