“एकटी कॉंग्रेस मोदींना टक्कर देऊ शकत नाही,विरोधकांची…” – के. सी. वेणुगोपाल

नवी दिल्ली – भाजपच्या विरोधात पडणारी मते फुटू नयेत यासाठी विरोधी पक्षांची एकजूट हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. आता कॉंग्रेसलाही विरोधी ऐक्याची काळजी वाटत आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक प्रसंगी सद्यस्थितीबद्दल सांगितले आहे की, कॉंग्रेस एकटी या सरकारचा सामना करू शकत नाही. कॉंग्रेस कोणत्याही परिस्थितीत लढेल; पण या लढाईसाठी विरोधकांची एकजूट हवी, असे स्पष्ट प्रतिपादन राहूल गांधी यांचे निकटवर्ती के. सी. वेणुगोपाल यांनी केले आहे.
याचा अर्थ वर्ष 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकारला एकट्याने सामोरे जाणे पक्षासाठी खूप कठीण असल्याचे कॉंग्रेसने प्रथमच मान्य केल्याचे मानले जात आहे. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीकडे लक्ष वेधत वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस एकटी या हुकूमशाही सरकारशी लढू शकत नाही.
वेणुगोपाल पुढे म्हणाले, सध्या देशातील परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे. सध्याचे सरकार संपूर्ण हुकूमशाहीत अवतरले आहे. देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. या हुकूमशाही सरकारशी लढा देणे हे विरोधकांसाठी, विशेषतः कॉंग्रेससाठी मोठे काम आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/government-is-committed-to-preserve-the-health-of-the-state-health-minister-tanaji-sawant/
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करून ते म्हणाले की, या यात्रेने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला असून, मोदी सरकारच्या विरोधात लवकरच धोरणे आणि योजना तयार करू, जेणेकरून हे सरकार उखडून टाकता येईल.





