मातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम! भर उन्हात चिमुकल्याला कडेवर घेऊन महिला पोलीस ऑनड्युटी
Updated On:

नवी दिल्ली – जगभरात ८ मार्च रोजी आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी सर्व महिला देश, जात-पात, भाषा, राजकारण, सांस्कृतिक भेदभाव विसरून एकत्र साजरा करतात. महिला दिनाच्या दोन दिवसाआधीच मातृत्व आणि कर्तृत्वाचा संगम असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चंदिगढ येथील हा व्हिडीओ असून एका ट्रॅफिक महिला पोलीस आपल्या चिमुकल्याला कडेवर घेऊन ट्रॅफिक व्यवस्थापन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी महिला पोलिसाला सॅल्यूट केला आहे.
उत्तरप्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबल सचिन कौशिक यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. पोलिसांचाही प्रतिमा सुधारण्याचे काम सचिन कौशिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतात.





