पिंपरी – डिजिटल माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे नियोजन पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) व टाटा मोटर्सने केले आहे. “पाणी बचत आणि माझा सहभाग’ या विषयावर ही वक्तृत्व स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील यांनी दिली.
पाणीपुरवठा विभागाचे सहकार्य आहे. विद्यार्थ्यांनी घरातूनच मोबाइलचा वापर करून 5 एप्रिलपर्यंत व्हिडिओ पाठवायचे आहेत. पाच मिनिटांची कालमर्यादा आहे. 12 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांना सहभागी होता येणार आहे. कुटुंबियांना बसवून सादरीकरण करीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे. स्पर्धा प्रमुख म्हणून शिक्षिका प्रतिमा काळे यांची निवड झाली आहे. स्पर्धेसाठी 9405042938 या क्रमांकावर नावनोंदणी करावी.