Cockroach Janata Party : ‘झुरळ’सोबत तुलना अन् थेट ‘कॉकरोच जनता पार्टी’चा उगम; जाहिरनामाही प्रसिद्ध, अवघ्या 3 दिवसांत मोठा प्रतिसाद
Cockroach Janata Party : वादानंतर सरन्यायाधीशांनी, भारताच्या बेरोजगार तरुणांवर टीका करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे स्पष्ट केले

Cockroach Janata Party : सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या ‘राजकीय पक्षाची’ जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षाचे नाव आहे ‘कॉकरोच जनता पार्टी’ म्हणजेच सीजेपी (CJP). तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटेल, पण दावा केला जात आहे की, पक्ष स्थापन झाल्याच्या अवघ्या तीन दिवसांतच ७० हजारांपेक्षा जास्त लोक याच्याशी जोडले गेले आहेत. सोशल मीडियावर या पक्षाबाबत सातत्याने चर्चा रंगत आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ नेमकी काय आहे? (Cockroach Janata Party)
हा प्रत्यक्षात कोणताही खरा राजकीय पक्ष नाही, तर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक्स हँडलवर राजकीय व्यंग म्हणून सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘आप’च्या (AAP) सोशल मीडिया कॅम्पेनिंगमध्ये काम केले होते.
या अकाउंटच्या बायोमध्ये असे सांगितले गेले आहे की, ही तरुणांची एक राजकीय आघाडी आहे. ‘तरुणांसाठी आणि तरुणांद्वारे’ या विचारसरणीवर हे हँडल काम करते. हे हँडल सरन्यायाधीशांच्या (CJI) त्या विधानानंतर तयार करण्यात आले असल्याने, याचा थेट संबंध त्याच वादाशी जोडून पाहिला जात आहे.
या पार्टीत सामील होण्याची पात्रता (Cockroach Janata Party)
मजेशीर बाब म्हणजे, या पार्टीत सामील होण्याची पात्रता देखील खूपच हटके आणि खास आहे. यासाठी तुम्ही बेरोजगार आणि आळशी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिवसातून कमीत कमी ११ तास ऑनलाईन राहत असाल, तर हा पक्ष तुम्हाला आपला सदस्य बनवून घेईल. Cockroach Janata Party
जाहीरनामा प्रसिद्ध
याशिवाय या पक्षाने आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे ज्यात महिलांना ५० टक्के आरक्षण देणे, मीडिया आणि न्यूज अँकर्सची जबाबदारी निश्चित करणे, निवृत्तीनंतर मुख्य न्यायाधीशांना राज्यसभेची जागा न देणे, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई करणे.
‘कॉकरोच’ नावामागे काय आहे संपूर्ण वाद?
खरं तर, हे संपूर्ण प्रकरण एका टिप्पणीनंतर सुरू झाले. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांबाबत एक विधान केले होते. ज्यामध्ये त्यांनी कथितरीत्या बेरोजगार तरुण, पत्रकारिता, आरटीआय (RTI) ॲक्टिव्हिझम आणि वकिली यांसारख्या क्षेत्रांत येणाऱ्या लोकांची तुलना “कॉकरोच” (झुरळे) आणि परजीवी यांच्याशी केल्याची बाब व्हायरल झाली होती. ही टिप्पणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आणि अनेक लोकांनी याला विरोधही केला.
सरन्यायाधीशांनी भूमिका स्पष्ट केली
भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या वादग्रस्त ‘कॉकरोच’ आणि ‘परजीवी’ (पॅरासाइट) विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्यांच्या विधानाचा मीडियाच्या एका घटकाने चुकीचा अर्थ काढला आहे.
त्यांचे लक्ष्य देशातील तरुण किंवा बेरोजगार नसून, ‘बनावट पदवी धारक’ होते. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, भारताच्या बेरोजगार तरुणांवर टीका करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. भारताच्या युवा शक्तीचा मला पूर्ण अभिमान आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
जरी नंतर यावर स्पष्टीकरण आले की विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, पण तोपर्यंत सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला होता. याच शब्दाचा तरुणांनी व्यंगाचे हत्यार म्हणून वापर केला आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव समोर आले. पाहता पाहता हे नाव इंटरनेटवर ट्रेंड करू लागले.
मात्र सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’वर मीम्स व्हायरल होत असले तरी याच विनोदाच्या आड तरुणांच्या नोकऱ्या, परीक्षांचे वाद, व्यवस्थेतील पारदर्शकता आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारखे गंभीर मुद्देही उपस्थित केले जात आहेत
हेही वाचा:
Reserve Bank of India : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द ! RBI कडून मोठी कारवाई







