व्यावसायीक गॅस सिलेंडर महागला ! महिन्याच्या पहिल्या दिवशी झाली तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
Updated On:

नवी दिल्ली – डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायीक गॅस सिलेंडराच्या दरात १६.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सलग पाचव्यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलचे जेवण आणखी महागण्याचा अंदाज आहे.
मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात.
मुंबईमध्ये १९ किलो वजनाचा व्यवसायिक गॅस सिलेंडर १७५४ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता १७७१ रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीमध्ये १८१८.५०, कोलकात्यामध्ये १९८०.५० रुपयांना सिलेंडर मिळेल. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.





