भारतीयांना दिलासा ! डेल्टा व्हेरियंटसंदर्भात ‘आयसीएमआर’ची महत्त्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली – करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र आता करोनाच्या डेल्टा व्हेरिएंट आणि तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या संदर्भात आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने दिलासादायक वृत्त दिलं आहे.
भारताची ‘मेड इन इंडिया करोना प्रतिंबधक कोवॅक्सिन लस करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी आहे, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे. करोना आपली रूपं बदलतो आहे. त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटने तर चिंता अधिक वाढवली होती. आगामी तिसऱ्या लाटेत मुख्य भीती डेल्टा व्हायरसची आहे.
भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस प्रभावी असल्याचे आधीच म्हटलं आहे. आता यावर आयसीएमआरने देखील शिक्कामोर्तब केलं आहे. भारतीयांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
COVAXIN effective against Delta Plus variant of COVID19, says Indian Council of Medical Research (ICMR) study pic.twitter.com/8DxlqXixt5
— ANI (@ANI) August 2, 2021
भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात 77.8 टक्के आणि करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला होता. तसंच करोनाच्या गंभीर प्रकरणात ही लस 93.4 टक्के आणि लक्षणं नसलेल्या करोनाविरोधात ही लस 63.6 सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं.





