पिंपरी -करोनाच्या महामारीमुळे पुणे-मुंबई रेल्वे मासिक पासची बंद केलेली सुविधा आणि जनरल तिकिटाची सेवा 22 मार्चपासून पूर्ववत होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटनेतर्फे वारंवार पाठपुरावा केला होता. संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
उद्योग, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त मुंबईला दररोज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून अनेक नागरिक मुंबईला जात असतात. मात्र, करोनाच्या महामारीमुळे रेल्वे सेवा बंद केली होती. करोना ओसरल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुणे-मुंबई रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास आणि जनरल तिकिटाची सुविधा अद्याप सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
याबाबत पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवाशी संघाने सातत्याने आवाज उटविला होता. या मागणीला यश आले असून येत्या 22 मार्चपासून पुणे-मुंबई रेल्वे मासिक पासची बंद केलेली सुविधा आणि जनरल तिकिटाची सेवा पूर्ववत होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी म्हणाले, पुणे-मुंबई रेल्वे मासिक पासची आणि जनरल तिकिटाची सेवा 22 मार्चपासून पूर्ववत होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांनी स्वतःहून करोना नियमांचे पालन करावे. जेणेकरून कमी झालेला करोना पुन्हा वाढू नये, यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुलानी यांनी केले आहे.