भाऊचा नाद नाही करायचा; थेट टी-शर्टवरच छापला लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा फोटो!

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. मात्र मुंबईतील लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे लोकलसेवा सुरु करण्यासाठी नागरिकांकडून अनेक वेळा मागणी केली जात होती. त्यामुळे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
https://twitter.com/one_by_two/status/1424397067951116293
सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासासाठी मुभा असणार आहे मात्र त्यासाठी लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच दोन लसमात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याची सुद्धा अट आहे.
लोलकमधून प्रवास करायचा असल्यास लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवे अनिवार्य आहे. त्यासाठी एका प्रसिद्ध कॉमेडीयने एक अनोखी शक्कल लढविली आहे. या पठ्ठ्याने थेट टी-शर्टवरच लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा फोटो छापला आहे. दरम्यान या टी-शर्टचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अतुल खत्री असे या कॉमेडीयनचे नाव आहे.
अतुल खत्री यांच्या या फोटाला नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिकिया येताना दिसून येत आहे. त्यांच्या हा फोटो कमी वेळात प्रचंड व्हायरल झाला आहे.





