satara | आ. शशिकांत शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा आ. महेश शिंदे गटात प्रवेश

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी)- बिचुकले, ता. कोरेगाव येथील आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटातील शेकडो मातंग व नाईक समाजातील पुरुष व महिला तसेच युवकांनी विकासकामांना प्राधान्य देत आमदार महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. या कार्यकर्त्यांनी प्रवेश करताच या समाजाच्या सांस्कृतिक भवणासाठी १० ते १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे आमदार महेश शिंदे यांनी जाहीर केले.
आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून बिचुकले गावात शेकडो कोटीची विकास कामे झाली असून काही विकासकामांना मंजुरी मिळाली. अशा नेतृत्वाला यापुढे साथ देण्यासाठी गावातील मातंग व नाईक समाजातील युवकांनी प्रवेश केला असून या दोन्ही समाजाच्या विकासकामासाठी आमदार महेश शिंदे कुठेही कमी पडणार नाहीत, असे कोरेगाव तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रकांत पवार व युवा नेते विशाल कदम यांनी सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विलास पवार, उद्योजक अमर पवार, ग्रामपंचायत सदस्य विश्वास अडागळे, बापू शिरतोडे, किरण पवार, शामराव आव्हाड, नितीन लोखंडे, राजेंद्र पवार, बाळू शिरतोडे, भाऊ शिरतोडे, अंकुश शिरतोडे, आनंदा सोनवणे, चंदू मदने, दिलीप अडागळे, शेखर बोडरे, बाळू बापू आडागळे,उपस्थित होते.





