पलक तिवारीची होतेय आहे,आई श्वेता तिवारीसोबत ‘तुलना’

अभिनेत्री पलक तिवारी आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. ती काल एका कार्यक्रमात दिसली, यादरम्यानच तिचा व्हिडिओ समोर आला आहे. श्वेता तिवारीच्या लेकीने तिच्या कारकिर्दीत फक्त एकच चित्रपट आणि एक म्युझिक व्हिडिओ केला आहे आणि सध्या ती तिच्या पुढील प्रोजेक्ट्सची तयारी करत आहे.
View this post on Instagram
तिने हार्डी संधूच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याने सर्वत्र खळबळ उडवून दिली. अशात तीची तुलना तिच्या आईसोबत होत आहे. तिची आई श्वेता तिच्यापेक्षा चांगली दिसत दिसत असल्याचे सोशल मीडियावर युजर्स म्हणत आहे. युजर्स म्हणाले,’तिच्यापेक्षा तिची आई अभिनेत्री श्वेता तिवारी चांगली दिसते.’
नुकतीच, एका इव्हेंटमध्ये पलक गोल्डन टॉप आणि डेनिम दिसून आली. यावेळी तिचा लूक खूपच छान दिसत होती. अभिनेत्रीने पापाराझींचा वाढदिवसही साजरा केला. पॅप्सने केक कापला यादरम्यानच व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पलक तिवारीला पाहून लोक म्हणाले,’पलकची आई तिच्या पेक्षा सुंदर दिसत असून सर्वांना श्वेताचा आवडते’ तिच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान पलक तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. तिचे नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत बऱ्याच काळापासून जोडले जात आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर पलक तिवारीने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.





