‘देर आए, दुरुस्त आए’ – जया बच्चन

नवी दिल्ली – हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या घटनेवर खासदार जय बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देर आए दुरुस्त आए, लेकिन देर से आए, असे त्यांनी म्हंटले आहे.
#WATCH Samajwadi Party MP Jaya Bachchan on accused in the rape and murder of the woman veterinarian in Telangana killed in an encounter: Der aaye, durust aaye…der aaye, bohot der aaye.. pic.twitter.com/sWj43eNCud
— ANI (@ANI) December 6, 2019
दरम्यान, बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. चारही आरोपींना त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.




