satara | आ. धोंडीराम वाघमारेंसाख्या विचारांचा आमदार माणला हवा

दहिवडी, (प्रतिनिधी) – माणदेश हा जगण्यासाठी धडपडणारां आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघा देशाला स्वाभिमानाचे धडे देणारा माणदेश . याच माणदेशातील शाश्वत शेतीसहीत पिण्याच्या पाण्यासाठी आपला आयुष्य खर्ची करणाऱ्या स्व. धोंडीराम वाघमारे यांचा सार्थ अभिमान वाटतो. सध्या माण तालुक्यास त्यांच्यासारख्या विचारांच्या आमदाराची गरज माण तालुक्यास आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
वडजल, ता. माण येथे आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या स्मारक अनावरण प्रसंगी बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, उत्तमराव जानकर, माण खटाव राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, अभय वाघमारे, निर्मला वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजीतसिंह देशमुख, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विलासराव माने, कविता म्हेत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात माणदेशी माणसं भेटतात.परिस्थिती वर मात करणारा माणूस म्हणून माणदेशी माणूस ओळखला जातो. प्रतिकुल परिस्थिती वर मात करणारा माणूस देशात पहिली सर्कस काढणारा माणूस ही माण तालुक्यातीलच.
अशक्य गोष्टी शक्य करणारा माणूस माणदेशी. प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत या भागाचा कायापालट करण्यासाठी पाणी पाहिजे हे ध्येय उराशी बाळगून धोंडीराम वाघमारे यांनी आपले आयुष्य वेचले. धोंडीराम वाघमारे साहेब. मला मंत्री पद नको माझ्या दुष्काळी भागाला पाणी द्या असे सांगणारा महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकमेव लोकप्रतीनिधी. म्हणून वाघमारे यांच्याकडे संपूर्ण माणदेश पाहतो. स्व. धोंडिराम वाघमारे यांचा अखंड विचार जपत तुम्ही सर्वांनी मार्गक्रमण करायला हवे.
खा. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, ज्यांनी जिहे कटापूर, उरमोडी योजना दिल्या त्या माजी आमदार धोंडिराम वाघमारे यांचे स्मारक निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. इथून पुढच्या काळात निश्चित पणाने धोंडीराम वाघमारे यांच्या विचारांचा वारसा अधिक बळकटपने पुढे नेण्याची जबाबदारी खासदार म्हणून माझी असेल.
माझ्या निवडणुकीत या माण खटावचे उपकार प्रचंड आहेत. विकासकामांच्या माध्यमातून ते निश्चितपणाने पूर्णत्वास नेऊ. माणची जनता स्वाभिमानी असून पवार साहेबांवर प्रेम करते.त्यामुळे पवार साहेबांचे हात बळकट करा. धोंडीराम वाघमारे यांच्या विचारांचा वारसा त्यांचे चिरंजीव अभय वाघमारे जपत असल्याचा अभिमान वाटतो.
अभय वाघमारे म्हणाले, माझा माणदेश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हे स्वप्न माझ्या वडिलांनी पाहिले होते. माझ्या वडिलांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून वसंत रातुत शरद भेटायला आला आहे. पवार साहेब राजकारणातील आॅक्सिजन श्वास आहेत. यावेळी निर्मला वाघमारे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
माण एक नाव द्या, मी निवडून आणतो
इथून पुढच्या काळात ही पाणी प्रश्नासाठी सगळ्यांनी एकत्रित रहा. तुम्ही निवडून कसे येत नाही ते मी पाहतो…माझे नाते दिल्ली श्वरापशी चालते. सगळ्यांनी एकत्र बसून एक नाव येत्या पंधरा दिवसात ठरवा. सत्ता असो किंवा नसो इथे आपलेच चालते. स्व. धोंडीराम वाघमारे यांच्या मनातील माण खटाव सत्यात उतरवण्यासाठी तयारीला लागा असे शरद पवार म्हणाले.





