पुणे : शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, तब्बल 55 गुन्हेगारांना अटक

Updated On:

पुणे (प्रतिनिधी)  – पुणे शहरात पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेने संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.

या झाडाझडतीत आर्म ऍक्‍टखाली तब्बल 55 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावडी कट्टे, देशी बनावटीची तीन पिस्तूल, नऊ काडतूसे, 40 कोयते, पाच तलवारी, 1 कुकरी, दोन पालघन व एक सुरा जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोरावळे, पोलीस उपायुक्त(गुन्हे) बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मंगळवारी रात्री 9 ते 1 दरम्यान करण्यात आली. यामुळे गुन्हेगारांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या पुढेही अचानक कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : शहरात अनधिकृत नळजोडांचा सुळसुळाट! अर्ध्या इंचाच्या ठिकाणी एक इंचाच्या जोडण्या

2026-11-22 18:39:34

Pune News : शहरात अनधिकृत नळजोडांचा सुळसुळाट! अर्ध्या इंचाच्या ठिकाणी एक इंचाच्या जोडण्या

Pune Municipal Corporation: सत्ताधाऱ्यांमध्ये निधीवरून धुसफूस

2026-11-22 08:21:28

Pune Municipal Corporation: सत्ताधाऱ्यांमध्ये निधीवरून धुसफूस

Vice President C. P. Radhakrishnan: ज्ञान आणि कौशल्याचा वापर राष्ट्र उभारणीसाठी करा...

2026-11-22 08:14:43

Vice President C. P. Radhakrishnan: ज्ञान आणि कौशल्याचा वापर राष्ट्र उभारणीसाठी करा...

FDA: अमेझॉन, बिग बास्केटचे परवाने निलंबित

2026-11-22 08:11:12

FDA: अमेझॉन, बिग बास्केटचे परवाने निलंबित

ZP School: झेडपी शाळा दुरुस्तीसाठी ६५ लाखांचा निधी मंजूर

2026-11-22 08:06:50

ZP School: झेडपी शाळा दुरुस्तीसाठी ६५ लाखांचा निधी मंजूर