पुणे जिल्हा | कॉलेज ऑफ फार्मसीचा महिला सबलीकरणवर आधारित देखावा

भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील राजगड ज्ञानपीठाचे कॉलेज ऑफ फार्मसीने महिला सबलीकरण आणि इको फ्रेंडली देखावा सादर केला आहे. ६४ कलागुणांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेशोत्सवाचे यंदाचे हे २४ वे वर्ष असून गणपती सजावटीसाठी संपूर्णपणे कागदाचा तसेच झाडांच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.
मोर, वृक्ष तसेच तुळजाभवानी देवीची प्रतिकृती हे सजावट आकर्षणाचे मुख्य विषय ठरले. महिला सबलीकरणाचा संदेश देणाऱ्या पोस्टर्सच्या माध्यमातून जन जागृती केली जात आहे. प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. काकासाहेब कोरे, डॉ. विश्वास भगत, डॉ. दीपक कर्डिले, डॉ. राहुल सोनवणे,
प्रा. सुचिता भिसे, प्रा. विशाल आदक, प्रा. श्रीकांत बोराटे, प्रा. तुषार शिंदे, प्रा. दिपक फाजगे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. वैभवी कुंजीर, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला .
राजगड ज्ञानपीठ कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे व मानद सचिव स्वरूपा थोपटे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.



