‘कॉलेजच्या पदव्या घेऊन काही होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका’; ‘या’ भाजप नेत्याने विद्यार्थ्यांना दिला अजब सल्ला

मध्य प्रदेश : काही राजकीय नेते आपल्या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. मध्यप्रदेशमधील भाजप नेत्याने विद्यार्थ्यांना असाच एक अजब सल्ला दिला आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सीलेंसच्या उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, ‘या कॉलेजच्या पदव्या घेऊन काही होणार नाही, मोटरसायकिलपंक्चरचे दुकान सुरू करा, ज्यामुळे कमीत कमी उदरनिर्वाह तर होईल.’ असा अजब सल्ला दिला आहे.
काय म्हणाले आमदार पन्नालाल शाक्य?
मी जे बोलणार आहे, ते विज्ञान व गणिताच्या फॉर्म्युल्याने सांगेन ते समजून घ्या. ही जी महाविद्यालये आहेत, शिक्षण संस्था आहेत या काही कंप्रेशर हाउस नाहीत. ज्यामध्ये डिग्रीच्या हिशोबाने हवा भरली जाईल आणि ते सर्टिफिकेट घेऊन जातील. वास्तवात शिक्षण संस्था अशा असतात ज्यांचे“ढाई अक्षर पढ़े सो पंडित होय,पोथीपढ़-पढ़ जगमुआ पंडित भया न कोय”
त्यांनी म्हटले की, नालंदा विद्यापीठ होते. या कॉलेजमध्ये तर १८ हजार विद्यार्थी आहेत. मात्र त्यामध्ये १२ हजार होते व १२०० शिक्षक होते. मात्र ११ लोकांनी ते विद्यापीठ जाळले होते. १२ हजार केवळ विचार करत राहिले की, मी एकटा काय करणार. त्यामुळे हिंदुस्तानचे ज्ञान संपले. सर्वात आधी पंचतत्व वाचवण्यासाठी प्रयत्न करा, ज्यापासून आपले शरीर बनले आहे. जल,वायु, अग्नि, आकाश, पृथ्वी. आज पर्यावरणाची समस्या गंभीर बनली आहे. प्रदूषण वाढल्याने लोक चिंतित आहे. मात्र यावर कोणता उपाय निघत नाही.
तसेच पुढे म्हणाले आज आपण प्रधानमंत्री श्रेष्ठ महाविद्यालयाचे उद्घाटन करत आहोत. माझे तुम्हाला सांगणे आहे की, केवळ एक बोध वाक्य लक्षात घ्या, ‘या कॉलेजच्या डिग्रीने काहीच होणार नाही. मोटरसायकल पंक्चरचे दुकान उघडा, ज्यामुळे कमीत कमी आपला उदरनिर्वाह तर चालेल असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. सध्या याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.





