पत्रकारितेत करिअर घडविण्याची ज्यांना इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना पुण्यातील अग्रगण्य दैनिक प्रभातने एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही पत्रकारिता सोडून इतर विषयातील शिक्षण घेत असाल आणि तुम्हाला पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा असेल तर, डिजीटल प्रभात ‘ओपन टू ऑल’ या समीकरणानुसार सर्वच विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे. “कॉलेज कनेक्‍ट 2.0” या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इच्छूक विद्यार्थ्यांना आपल्यातील पत्रकारितेच्या गुणांना वाव देता येणार आहे.

यापूर्वी २०१२ साली दैनिक प्रभात ने कॉलेज कनेक्ट च्या माध्यमातून कॉलेज रिपोर्टर ही संकल्पना सुरू केली. कॉलेज कनेक्ट च्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रतिसादा नंतर आता ‘कॉलेज कनेक्ट 2.0’ दैनिक प्रभात घेऊन येत आहे.

पुण्यातील एका सर्वोत्कृष्ट मीडिया माध्यमासोबत काम करण्याची संधी मिळावी असे वाटत असेल तर तुमची इच्छा आम्ही पुर्ण करणार आहोत. आमच्यासह इंटर्न, कॉलेज रिपोर्टर म्हणून काम करण्याची संधी दैनिक प्रभातने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये पुणे आणि पुणे परिसरातील सर्वच महाविद्यालयातील फर्स्ट किंवा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हिडीओग्राफीसह पत्रकारितेतील आवश्यक माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थाला आपले नाव ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून पत्रकारितेच्या विश्‍वात येता येणार आहे.

Contact us by filling out the form below.