Collector Santosh Patil: कोरेगाव तालुका बनणार सेंद्रिय शेतीचा आदर्श; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा विश्वास
Collector Santosh Patil: रहिमतपूर येथे ‘आत्मा’ आणि विश्वकल्याण कंपनीतर्फे जैविक निविष्ठा कार्यशाळा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार.

Collector Santosh Patil – सिक्कीम टू सातारा हा उद्देश ठेवून काम केल्यास कोरेगाव तालुका हा सेंद्रीय शेतीचा आदर्श तालुका होऊ शकतो, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले. तसेच तालुक्यात सेंद्रिय शेतीचा व्यापक प्रसार करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे जैविक निविष्ठा निर्मिती कार्यशाळा व सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा, तालुका कृषी अधिकारी, कोरेगाव आणि विश्वकल्याण ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अजय शेंडे, जिल्हा कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे, ‘आत्मा’चे उपप्रकल्प संचालक राहुल माने, रहिमतपूरच्या नगराध्यक्षा सौ. वैशाली माने,
तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. आशा भोसले, विश्वल्याण ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अरुण माने, व उपाध्यक्ष शिवाजीराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांनी मुख्यमंत्री विषमुक्त किचन घर अभियान योजनेबाबत मार्गदर्शन केले.
भाग्यश्री फरांदे यांनी सेंद्रिय शेतीची प्रभावी अंमलबजावणी, सेंद्रिय प्रक्रिया, विक्री व मार्केटिंग व्यवस्था तसेच शेतमालाचे आकर्षक ब्रॅण्डिंग व दर्जेदार पॅकेजिंग कसे असावे याविषयी माहिती सांगितली. बाळासाहेब खेमनार, योगेश निकम, ज्ञानदेव जाधव, नीतीराज साबळे, अजय शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी अनंत माने, रहिमतपूर, अशोक चिवटे, किन्हई, अमोल भोसले, एकसळ, व उमेश पाटील,
सांगली, सेंद्रिय प्रगतशील शेतकरी बाळासाहेब साळुंखे, तासवडे यांचा सत्कार जिल्हाधिकारी संतोष पाटील हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक नाना राऊत, किरण भोसले, सौ.भाग्यश्री शेरकर तसेच शशिकांत माने, बेदिल माने, विक्रम माने, मधुकर माने, तसेच तालुका कृषी अधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी, सेंद्रिय उत्पादक शेतकरी, उपस्थित होते. प्रास्ताविक अरुण माने यांनी यांनी केले. तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांनी आभार मानले.






