Sandeep Deshpande : ‘झुरळांनी बेगॉनला हरवलं’, संदीप देशपांडेंचा मोदी सरकारला खोचक टोला
Sandeep Deshpande : मुंबईत आज विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा आनंद साजरा केला जाणार

Sandeep Deshpande : नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी देशातील युवाशक्तीच्या एकजुटीच्या माध्यमातून देशासह देशाबाहेरही विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. या युवाशक्तीच्या एकजुटीमुळेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकारला घ्यावा लागला. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. या घडामोडीनंतर केंद्रीय शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या माध्यमातून त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये झुरळ मारण्याच्या स्प्रेवर नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत आहे. या फोटोसोबत ‘झुरळांनी बेगॉनला हरवलं’, असे कॅप्शन संदीप देशपांडे यांनी लिहले आहे. संदीप देशपांडे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
झुरळांनी बेगॉन ला हरवलं pic.twitter.com/xocwfbaIOD
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2026
दरम्यान, आज राज आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईत विद्यार्थी आंदोलनाच्या विजयाचा आनंद साजरा केला जाणार आहे. याआधी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, काल धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यामुळे आता आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
हेही वाचा:
Nane Maval : नाणे मावळात वारंवार बत्ती गुल; खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त





