Abhijeet Dipke Cockroach Janata Party : माझे नशीब.! कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके दिल्लीकडे रवाना; ट्विट करत म्हणाले….
अभिजीत दिपके यांनी दि. ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Abhijeet Dipke Cockroach Janata Party : देशाच्या सरन्यायाधीशांच्या तरुणाबाबतच्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल चळवळीची देशभरात चर्चा सुरू असतानाच आता या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे.
या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दि. ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते आणि कला क्षेत्रातील काही लोकांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
उद्या अभिजीत दीपके भारतात येत आहे. त्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, सध्या पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ‘माझे नशीब भारताच्या संविधानाच्या हातात सोडत आहे’, असेही त्याने म्हटले आहे. (Abhijeet Dipke Cockroach Janata Party)

Abhijeet Dipke Cockroach Janata Party : माझे नशीब.! कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके दिल्लीकडे रवाना; ट्विट करत म्हणाले….
अभिजीत सध्या अमेरिकेत राहतो आणि त्याने तिथूनच कॉकरोच जनता पार्टी नावाने सोशल मीडियावर खाते उघडले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद भारतातून मिळाला. आता ते पुन्हा भारतात येत आहेत.
On my way to India…
Leaving my fate in the hands of the Constitution. #JaiBhim
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) June 5, 2026
सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद : Abhijeet Dipke Cockroach Janata Party
कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाउंटला आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी फॉलो केलं आहे. तर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला ३ लाख ९६ हजार युझर्स फॉलो करत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आकडे अकाउंट सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमधील आहेत. आणि तासागणिक हे आकडे वाढतच चालले आहेत.
कॉकरोच जनता पार्टीचे तीन प्रवक्ते कोण?
कॉकरोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची नावं जाहीर केली आहेत. लेखक आणि निर्माता विजेता दहिया आणि IIT Kanpur चे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे.
सीजीपी भारताची राजकीय भाषा आणि विचार बदलण्याचे काम करत आहे. नवीन पिढीतील नेत्यांच्या नेतृत्वात हे काम करण्यात येईल असे म्हटले आहे.





